बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या संचालक पदाची निवडणूक नुकतीच होऊन मावळते चेअरमन प्रकाश मरगाळे यांच्यासह बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली.
पुढील 2025 -2030 साला करिता श्री तुकाराम बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया काल रविवारी निवडणूक अधिकारी सी. आर. पाटील यांच्या निर्देशाखाली पार पडली. सदर निवडणुकीमध्ये 2025 -2030 सालासाठी बँकेच्या 14 संचालकांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये प्रकाश आप्पाजी मरगाळे, प्रदीप शंकरराव ओऊळकर, राजेश यशवंत पवार, अनंत रामचंद्र जांगळे, नारायण कृष्णाजी पाटील, प्रवीण वसंतराव जाधव, राजू यशवंत मरवे, मोहन परशराम कंग्राळकर,
मदन बाबुराव बामणे, संजय कल्लाप्पा बाळेकुंद्री, सुनील नारायण आनंदाचे, संदीप श्रीधर मुतकेकर, सौ. वंदना अशोक धामणकर व सौ. पल्लवी लक्ष्मण सरनोबत यांचा समावेश आहे. बिनविरोध निवड झाल्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन होत आहे.