बेळगाव लाईव्ह : अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्तानच्या क्रिकेट संघाने एस के लायन्स बाळेकुंद्री या संघाचा पराभव करत कडोलीयेथील श्री वेंकटेश्वर ट्रॉफी वर नाव कोरले.
श्री वेंकटेश्वर ट्रॉफी कडोली या
भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत श्री राम सेना हिंदुस्थान अनगोळ यांनी तर
द्वितीय क्रमांक एस के लायन्स बाळेकुंद्री या संघाने पटकावला.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना एस.आर.एस हिंदुस्थान या संघाने 6 षटकामध्ये 3 गडी बाद 65 धावा जमविल्या, या धावांचा पाठलाग करत असताना एस के लायन्स बाळेकुंद्री या संघाने 6 षटकात 4 गडी बाद 57 धावा जमवत 8 धावांनी एकतर्फी पराभव पत्करावा लागला.
राकेश असलकर हा अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला तर मालिकेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून एस के लायन्स बाळेकुंद्रीचा अभी याला गौरविण्यात आले.मालिकेतील उत्कृष्ट गोलंदाज कडोली संघाचा तुषार देसाई यांना घोषित करण्यात आले. मालिकावीर म्हणून एस आर एस हिंदुस्थान संघाचा वसंत शहापूरकर याची निवड झाली
या सामन्यावेळी अशोक डोंबले, सचिन पाटील, लक्ष्मण कडेमणी, सुभाष मायांना, मल्लेश कांबळे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सामना पार पडला.