बेळगाव लाईव्ह : डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या आगमनापूर्वी अनेक रिसॉर्ट पार्ट्यांना ऊत येतो. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात विशेषता गोव्याच्या रस्त्याला रिसॉर्टची संख्या भरपूर आहे. अशाच खानापूर तालुक्यामधील कणकुंबी विभागातील एका रिसॉर्टमध्ये बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे.
सदर युवक हा रविवारी एका खासगी रिसॉर्टमध्ये मौजमजेसाठी गेलेला असताना त्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. रविवार 29 रोजी, सायंकाळी घडली घडली आहे. महांतेश गुंजीकर (वय 27), खासबाग, बेळगाव असे घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
या घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृत हा एलजी कंपनीचा कर्मचारी होता तो शनिवारी सायंकाळी एलजी कंपनीच्या बेळगाव शाखेतील 22 कर्मचाऱ्यांसोबत पार्टी करण्यासाठी कणकुंबी भागातील रिसॉर्टमध्ये गेला होता.रविवारी दुपारी तो जलतरण तलावात उतरला होता. त्यावेळी महांतेश गुंजीकर यांचा स्विमिंग ट
या घटनेनंतर महांतेशच्या मित्रांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला व त्याला बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. जिल्हा रुग्णालयासमोर मृताच्या कुटुंबीयांनी एकच गर्दी केली होती. खानापूर पोलीस ठाण्