Wednesday, January 22, 2025

/

मराठा बँकेत सत्ताधारी गटाची सत्ता एका जागेवर अपक्ष विजयी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: मराठा समाजाचा मानबिंदू समजली जाणारी मराठा को आप बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने सरशी मिळवली. केवळ सामान्य गटातील एक जागा वगळता सर्व जागांवर विजय मिळवला त्यामुळे बँकेत ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील आणि विद्यमान अध्यक्ष दिगंबर यांच्या नेतृत्वाच्या गटाचीच सत्ता असणार आहे. या अगोदर प्रशांत चिगरे हे ओबीसी अ गटातून बिन विरोध निवडून आले आहेत.

रविवारी दिवसभर मराठा बँकेसाठी अगदी चुरशीने मतदान झाले अत्यंत चुरशीच्या झालेल्या मराठा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने विजय संपादित केला. या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लोकांनी बँकेसमोर गर्दी केली होती.

चुरशीने मतदान मराठा सहकारी बँकेसाठी सकाळी ९ वाजल्यापासूनच चुरशीने मतदान करण्यात आले. सकाळी लवकर उमेदवार आणि त्यांचे समर्थक बसवाण गल्ली येथील कार्यालयातील मतदान केंद्राकडे हजर होते. साडेनऊ नंतर मतदारांची गर्दी वाढली. मोठ्या चुरशीने मतदान करण्यात येत होते. अनेकांनी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती. मतदान केंद्रापर्यंत जाईपर्यंत उमेदवारांकडून प्रचार करण्यात येत होता.
मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची गर्दी झाली होती. त्यामुळे या भागात वाहनांची कोंडी होत होती. समर्थकही मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. त्यामुळे परिसरात राजकीय रंग भरला होता.

एका मतदाराला मतपत्रिकेवर चौदा शिक्के मारावे लागत होते. त्यामुळे जुने मतदार गोंधळत होते. मतदारांसाठी बँकेतर्फे चहापानाची सोय करण्यात आली होती. किरकोळ वादावादी वगळता, मतदान प्रक्रिया शांततेत आणि चुरशीने झाली. महिला गटातून विजयी झालेल्या रेणू किल्लेकर यांनी सर्वाधिक 1063 मते मिळवली.Maratha bank logo

संध्याकाळी साडेसात वाजता निवडणूक अधिकाऱ्यांनी पहिला निकाल घोषित केला. त्यामध्ये अनुसूचित जाती गटातून अशोक कांबळे यांनी विजय मिळविला. त्यांना 841 इतकी मते मिळाली. तर त्यानंतर राखीव महिला गटातून रेणू किल्लेकर आणि दिपाली दळवी यांनी विजय मिळविला. त्यांना अनुक्रमे 1063 व 868 इतकी मते मिळाली. त्यानंतर इतर मागास ब गटातून विश्वजीत हसबे यांनी विजय मिळविला. त्यांना 791 इतकी मते मिळाली. अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक यांनी विजय मिळवला. त्यांना 921 इतकी मते नक्की मिळाली.

नवव्या जागेसाठी इथे मोठी चुरस!

सामान्य गटातील मतमोजणीत मोठी चुरस दिसून आली. आठ टेबल मतमोजणीसाठी होते. सत्ताधारी पॅनलचे उमेदवार सुरुवातीपासून आघाडीवर होते. पण यावेळी अपक्ष उभे राहिलेले लक्ष्मण होनगेकर यांनी तगडी फाईट देत 9पैकी 8 जागेवर विजय मिळवला.Maratha bank

होनगेकर यांनी दिलेल्या फाईट मुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रत्येक टेबल वर फेरीत होनगेकर यांनी लहान आघाडी मिळवली होती ती शेवट पर्यंत कायम राखली. सत्ताधारी गटातील पॅनल मधील कदम पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. विनायक होनगेकर हे नवव्या जागेसाठी निवडून आले.

रात्री आठ वाजल्या पासून पहिला निकाल घोषित करण्यात आला त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून फटाके वाजवून जल्लोष करण्यात येत होता. शेवटपर्यंत उमेदवार आणि समर्थकांत धाकधूक होती.

सामान्य 9 जागांसाठी विजयी उमेदवार
दिगंबर पवार 921 मते विजयी, बाळाराम पाटील 883 मते विजयी, बाळासाहेब काकतकर 868 विजयी,विनोद हंगिरकर 863 विजयी, मोहन चौगुले 783, विश्वनाथ हंडे 771 विजयी, मोहन बेळगुंदकर 733 विजयी , लक्ष्मण होनगेकर 655 विजयी , विनायक होनगेकर 648 विजयी,

सामान्य गटातून पराभूत झालेल्या विक्रमसिंह कदम पाटील यांना 569 मते तर  बी एस  पाटील यांना 315 मते मिळाली.

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.