बेळगाव लाईव्ह :बेळगावची उदयोन्मुख शुटर निधी राजेंद्र कुलकर्णी हिंची राष्ट्रीय पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे.
नुकत्याच नवी दिल्ली येथील डॉ करणीसिंग शूटिंग रेंज येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत निधी पात्रता फेरी पार करीत युथ कॅटेगरी गटात संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे.
बंगळूर येथील स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या येथे झालेल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावित आपली पात्रता सिद्ध केली.
ती आता राष्ट्रीय स्पर्धेत युथ कॅटेगरी गटात खेळणार असून ति आगामी भारतीय संघासाठी निवडण्यात भारतीय संभाव्य संघात तिची निवड झाली आहे तिला अर्जुन शूटिंग अकादमीचे शूटिंग प्रशिक्षक गिरीश हलबावी व हुबळी शूटिंग अकादमीचे रविचंद्र बाळेहोसुर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ती अनगोळ येथील दंत चिकित्सा प्रसिद्ध डॉ राजेंद्र कुलकर्णी व डॉ आबा गाडगीळ- कुलकर्णी यांची कन्या तसेच संत मीरा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नीलिमा गाडगीळ यांची नात होय तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.