बेळगाव लाईव्ह :जुने बेळगाव युवा संघ आयोजित बैलगाडा ओढण्याची शर्यत उत्साहात पार पडली. बेळगाव तालुका शहर परिसरातील शेकडो स्पर्धकांनी या बैलगाडा ओढण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
जुने बेळगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमर बाळेकुंद्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या स्पर्धेस उद्घाटन कार्यक्रमाला अनेक दिग्गज आणि हजेरी लावली होती. शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक बैलगाडा ओढणाऱ्या स्पर्धकांनी आपली शक्ती आजमावली तर रविवारी शेवटच्या दिवशी मध्यरात्री एक वाजेपर्यंत स्पर्धेचा उत्साह अमाप होता. या स्पर्धेत 108 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे समालोचन युवा नेते संतोष शिवनगेकर यांनी केले.स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला कॅन बक्षीस देण्यात आले या स्पर्धेत यश मिळवलेले विजयी स्पर्धकांची नावे अशी आहेत.
लहान गट
प्रथम क्रमांक सिद्धेश्वर प्रसन्न मुचंडी द्वितीय क्रमांक नागनाथ प्रसन्न बेकिनकरे तृतीय क्रमांक, कलमेश्वर प्रसन्न एम के हुबळी,चतुर्थ जय हनुमान प्रसन्न यरमाळ, पाचवा क्रमांक दुर्गादेवी प्रसंग एम के हुबळी.
सहावा क्रमांक सिद्धेश्वर प्रसन्न यरमाळ, सातवा क्रमांक लक्ष्मी प्रसन्न हल्याळ , आठवा क्रमांक लक्ष्मी प्रसन्न हल्याळ, नववा क्रमांक किसन होसुरकर जूने बेळगाव, दहावा क्रमांक मंजुनाथ पाटील यरमाळ आणि अकरावा क्रमांक पिसेलिंगेश्वर प्रसन्न हल्याळ
मोठा गट
प्रथम क्रमांक,नागेश नायक देवलापुरकर,द्वितीय क्रमांक चव्हाटा प्रसन्न कणबर्गी,तृतीय क्रमांक अंजनेय प्रसन्न बडाल अंकलगी,चतुर्थ क्रमांक दुर्गादेवी प्रसन्न संती बस्तवाड, पाचवा क्रमांक कलमेश्वर प्रसन्न एम.के.हुबळी,
सहावा क्रमांक सिध्देश्वर प्रसन्न मुचंडी,सातवा क्रमांक सिध्देश्वर प्रसन्न हन्नीकेरी, आठवा क्रमांक श्री सिध्देश्वर प्रसन्न यरमाळ,नववा क्रमांक लक्ष्मी प्रसन्न मत्तलमरी, दहावा क्रमांक मंगाईदेवी प्रसन्न वडगाव,अकरावा क्रमांक बिष्टादेवी प्रसन्न कक्केरी