Wednesday, December 4, 2024

/

मराठा सेंटरच्या अग्निवीरांचा पासिंग आऊट परेड

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे ६५१ अग्नीविर जवानांचा दीक्षांत समारंभ आणि शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या भव्य समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी उपस्थित होते.

६५१ अग्नीविर जवानांनी ३१ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तिरंगा ध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर अग्नीविर जवानांनी शानदार संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. या परेडचे नेतृत्व अग्नीवीर अतुल लहाने आणि मेजर संदीप कुमार यांनी केले.Mlirc

मिलिटरी बँडने देशभक्तीपर धून सादर केली, ज्यामुळे उपस्थितांना मोठा आनंद झाला. प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या साहिल शिंदेला ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते उत्कृष्ट अग्नीविर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समारंभानंतर, शहीद जवानांना युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या विशेष समारंभात मराठा अधिकारी, वायू दलाचे अधिकारी, निवृत्त अधिकारी आणि अग्नीविर कुटुंबीय उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.