Friday, January 3, 2025

/

परिस्थितीशी दोन हात करत निखिल भट बनला सीए!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : नुकत्याच झालेल्या नोव्हेंबर महिन्यातील सी ए परिक्षेत बेळगावच्या निखिल भट या युवकाने सीए पदवी प्राप्त केली आहे. अत्यंत किचकट मानल्या जाणाऱ्या या विषयात चिकाटीने प्रयत्न करत यशाचा टप्पा निखिल भट याने गाठला असून हे यश संपादन करण्यासाठी सीए विनयकुमार अलीअण्णावरमठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर काका प्रकाश भट यांचे आर्थिक सहाय्य लाभले.

एम. व्ही. हेरवाडकर शाळेत शालेय शिक्षण तर केएलई विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या निखिल भट या तरुणाला सीए चे शिक्षण पूर्ण करण्याची मोठी आवड होती. आपल्या आवडीला जिद्द आणि चिकाटीमध्ये परिवर्तित करून अखेर निखिल भट ने सीए सारखी अत्यंत कठीण मानली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादित केले आहे.

आपल्या यशाबद्दल ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना निखिल भट यांनी सांगितले की वडील नित्यानंद भट यांचा ‘ नितीन टेलर्स ‘ नावाने टेलरिंगचा व्यवसाय होता.तीन भाऊ आणि दोन बहिणी असलेल्या मोठ्या कुटूंबात कर्ता पुरुष म्हणून वडिलांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन केवळ कुटुंबासाठीच या व्यवसायात लक्ष केंद्रित केले.स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले तरी त्यांना आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देण्याची मनापासून इच्छा होती.

ते एक प्रसिध्द नावाजलेले शिंपी असल्याने या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसला होता.मात्र 1994 च्या मास्टर प्लॅनमध्ये सरकारने त्यांचे दुकान पाडले आणि त्यांना दुसरे दुकान पहिले रेल्वेगेट भाजीमार्केट येथे दिले गेले.मात्र दुकानाची कागदपत्रे बरोबर नव्हती. ती कागदपत्रे दुरुस्त करण्या साठी त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 32 वर्षे कोर्ट केस द्वारे कायदेशीर लढा दिला.मात्र त्यांना यश आले नाही.Nikhil bhatt

दोन वर्षांपूर्वी वाटप केलेले दुकानही पाडले गेले.त्या ऐवजी त्यांना रेल्वेगेटच्या साई मंदिर जवळील एक दुकानगाळा देण्यात आला पण तिथे वीज जोडणीच नाही. अशा पद्धतीने आपला व्यवसाय टिकवण्यासाठी माझ्या वडिलांना 32-34 वर्षे लढा द्यावा लागला. व्यवसायातील बहुतांश कमाई या लढ्यासाठीच खर्च झाली.अजूनही न्याय मिळाला नाही. यामुळे माझ्या व बहिणीच्या शिक्षणासाठी माझ्या काकांनी आर्थिक सहाय्य केले.

सीएचे शिक्षण घेताना अर्धवेळ नोकरी करून आपले शिक्षण जिद्दीने पुर्ण केले. निखिलची बहीण निकिता भट ही देखील सी ए चे शिक्षण घेत आहे. या सार्‍या कठिण परिस्थितीत माझी आई नीमा भट हीनेही खुप मोलाची साथ दिली.

वडिलांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक पेचाला न डगमगता आपले शिक्षण आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी चिकाटी आणि जिद्दीने आपण शिक्षण पूर्ण केले. चिकाटी आणि जिद्दीमुळेच आपण सीए परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो, यासाठी माझ्या आई – वडिलांसह शिक्षक आणि मार्गदर्शकांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे निखिल भट यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.