Thursday, January 2, 2025

/

थर्टी फर्स्ट’ चे काउंट डाऊन सुरू… ओल्ड मॅन दहनासाठी सज्ज

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गतवर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून ‘थर्टी फर्स्ट’ चे काउंट डाऊनही सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘ओल्ड मॅन’ च्या प्रतिकृतीची मागणी वाढली आहे.

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना मध्यरात्री ओल्ड मॅनच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची परंपरा अनेक वर्षांपासूनची आहे. ओल्ड मॅनच्या दहनाशिवाय सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचे स्वागत अधुरे असते.

पूर्वी गल्लोगल्लीतील मुले व युवक स्वतःहून ओल्ड मॅनची प्रतिकृती तयार करून त्याचे दहन करत असतं. मात्र या सर्वांचे श्रम वाचवण्यासाठी कालांतराने बाजारपेठेत रेडिमेड ओल्ड मॅन प्रतिकृती मिळू लागल्या. बेळगावामध्ये सर्वप्रथम कॅम्प येथील काही लोकांनी ओल्ड मॅन तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. प्रारंभी जुजबी नफा मिळवून देणारा हा व्यवसाय आजच्या घडीला संबंधित लोकांना न्यू इयर अर्थात 31 डिसेंबरच्या आधी ओल्ड मॅन च्या माध्यमातून मोठा नफा कमवून देत आहे. कॅम्प येथे सुरू झालेला ओल्ड मॅन तयार करण्याचा व्यवसाय कालांतराने शहर उपनगरात देखील पसरला आहे.

त्यामुळे आता कॅम्पसह बऱ्याच ठिकाणी ‘थर्टी फर्स्ट’च्या उत्सवासाठी रेडीमेड ओल्ड मॅन उपलब्ध होत असतात. सध्या कॅम्पसह शहर उपनगरातील बऱ्याच ठिकाणी हे रेडिमेड ‘ओल्ड मॅन’ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

ओल्ड मॅन तयार करणाऱ्या कॅम्प येथील मोरे -कांबळे कुटुंबातील नितीन मोरे याने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले की, आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून 31 डिसेंबर नववर्षाच्या स्वागतासाठी ओल्ड मॅनच्या प्रतिकृती तयार करण्याचा व्यवसाय करत आहोत.Old man

माझ्या आजोबांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांचा मुलगा अमित लक्ष्मण कांबळे यांनी पुढे चालू ठेवला त्यानंतर अमित यांचे भाचे म्हणजे आम्ही सध्या हा व्यवसाय सांभाळत आहोत. दरवर्षी आम्ही ऑर्डरनुसार लहान-मोठे म्हणजे 10 ते 15 फुट उंचीचे ओल्ड मॅन तयार करतो. बेळगावातील चर्च आणि हौशी मंडळींसह गोवा वगैरे परगावातूनही आम्हाला ओल्ड मॅन बनवण्याच्या ऑर्डर मिळतात.

ग्राहकाच्या पसंतीनुसार एका रात्रीत आम्ही ओल्डमॅनच्या प्रतिकृती तयार करून देतो. सध्या आमच्याकडे उपलब्ध ओल्ड मॅन प्रतिकृतीची किंमत लहान ओल्ड मॅन 1 हजार रुपये, मध्यम उंचीचे 2 हजार रुपये, 7 फुटाचे ओल्ड मॅन 3 हजार रुपये आणि त्यापेक्षा अधिक उंचीचे उंचीनुसार 10 हजार रुपयांपर्यंत आहे अशी माहिती देऊन ओल्ड मॅन तयार करण्यासाठी गवत, बांबू, कागद, कागदाचे रट्ट आदी गोष्टींचा वापर करण्याबरोबरच शेवटी कलर पेपरव्दारे ओल्ड मॅनला सजवले जाते, असे नितीन मोरे याने सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.