बेळगाव लाईव्ह : नवजात बालिकेला जन्मदात्या आईने जिल्हा रुग्णालयात टाकून पळ काढण्याची घटना ताजी असताना बेळगाव शहर परिसरात पुन्हा एक निर्दयी घटना घडली आहे. केवळ दोन महिन्याच्या बाळाला आईने तलावात सोडल्याची निर्दयी घटना बेळगाव शहरालगतच्या कणबर्गी येथे उघडकीस आली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारा या घटनेने कणबर्गी परिसरात खळबळ माजली असून त्या नवजात बाळाला ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटने संदर्भात पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शांता नावाच्या पस्तीस वर्षीय महिलेने आपल्या दोन महिन्याच्या बाळाला तलावात फेकून दिले होते मात्र त्या बाळाला वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या दोन महिन्याचा नवजात बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शांता वय 35 असे या निर्दयी मातेचे नाव असून रॉबर्ट करीन कोप असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे असे सांगण्यात येत आहे. त्या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून माळ मारुती पोलिसात त्या महिलेची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेला तब्येत घेऊन चौकशी केली असता प्राथमिक तपासणीत तिने सांगितले की बाळाला फिट्स आणि एपिलेप्सी होत असे त्यामुळे तिने हे कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
नवजात बालिकेला आईने टाकले वाऱ्यावर: उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू