बेळगाव लाईव्ह :खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी समाजसेवक विवेक तडकोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर माहिती अधिकार कार्यकर्तेभीमाप्पा गडाद यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी जांबोटी येथील सर्व्हे क्रमांक 3 मधील 508 एकर 20 गुंठे जमिनीच्या प्रकरणात कर्तव्यात हलगर्जीपणा केला असल्याचा दावा केला आहे.
खानापूर तालुक्यातील. याबाबतच्या बातम्याही दैनंदिन वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध होत असून खानापुर तहसीलदार यांच्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकारच्या बेनामी मालमत्ता असल्याची माहिती ऐकायला मिळत आहे.
प्रकाश गायकवाड यांनी सेवेत रुजू होण्यापूर्वी आणि त्यानंतर त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या नावावर असलेल्या जमिनींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विवेक तडकोड यांनी केली आहे.
तक्रारीत, खानापूर, हल्याळ आणि उचगाव हद्दीतील अनेक सर्व्हे क्रमांकांचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये कुटुंबाच्या नावावर जमिनी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत उपलब्ध कागदपत्रांचा आधार घेत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
समाजसेवक विवेक तडकोड यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंतीजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.