बेळगाव लाईव्ह : 2006-07 साली बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) कणबर्गी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. मात्र, 17 वर्ष उलटूनही या जमिनींवर कोणताही लेआउट तयार करण्यात आलेला नाही,
तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाईही अद्याप मिळालेली नाही. या अन्यायाविरोधात कणबर्गी गावातील शेतकऱ्यांनी आज बुडा विरोधात आंदोलन केले.
जमीन संपादन केल्यानंतर उताऱ्यावरून शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. तसेच, 17 वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पाबाबत बुडा कडून खुलासा करण्यात यावा.
तसेच बुडा वारंवार छोटे कंत्राटदार नेमून काम सुरू करते, मात्र ते अर्धवट सोडले जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीचाही आधार उरलेला नाही. त्यांनी प्रकल्प तातडीने सुरू करून 17 वर्षांच्या विलंबाचा हिशेब देण्याची आणि नुकसानभरपाईसह भरपाई देण्याची मागणी करत लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली.
या आंदोलनात कणबर्गी गावातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.