बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये 1924 मध्ये झालेल्या काँग्रेस शताब्दी महोत्सव बेळगाव शहरात भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी बेळगाव तालुका शैक्षणिक वलयातील (शहर व ग्रामीण) सर्व सरकारी अनुदानित
आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना, त्याचप्रमाणे व ग्रामीण योजनेच्या सर्व अंगणवाडी शाळांना उद्या गुरुवार दि. 26 आणि परवा शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2024 रोजी असे दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तसा आदेश जारी केला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवरील नेते मंडळी, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार अतिमहनीय व्यक्ती, स्वातंत्र्य सेनानी हजेरी लावणार आहेत.
परिणामी शहरातील वाहन संचार वाढणार असल्यामुळे शालेय मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये बेळगाव तालुका शैक्षणिक
वलयातील (शहर व ग्रामीण) सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा अंगणवाड्यांना उद्या 26 व परवा 27 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.