बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांना बिम्सवर विश्वास नसल्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे, पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह इतरत्र पाठवण्यात आला .
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय गर्भवती महिलेला काल प्रसूतीसाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल सिझेरियन प्रसूतीनंतर तंदुरुस्त झालेल्या वैशालीच्या छातीत दुखू लागल्याने आज पहाटे मृत्यू झाला. डॉक्टरांचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे. आणि त्यांचा बिम्सवर विश्वास नाही. त्यामुळे मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी इतरत्र द्याचा असा त्यांचा आग्रह होता.
पैसे देऊन खाजगी रुग्णालयात जा, जीव वाचवा. इथे रुग्णांचा विचार करणारा कोणीही नाही. छातीला वेदना होत असताना कोणीही येऊन पाहत नाही, अशा परिस्थितीत कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही, असे प्रसूती विभागाच्या समोर मृत वैशालीची आजी रडत सांगत होती.
पत्नीची प्रकृती बिघडल्याचे दिसताच अनेक वेळा डॉक्टरांना बोलावले, मात्र गंभीर झाल्यावर त्यांनी येऊन पाहिले. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच माझी पत्नी मृत्यूमुखी पडली, असा आरोप मृत वैशालीचा पती इराण्णा कोटबागी यांनी केला आहे.
शनिवारी सकाळी वैशालीने सीझेरियन प्रसूतीद्वारे मुलीला जन्म दिला होता. काल दिवसभर चांगली असलेल्या वैशालीला आज सकाळी छातीला वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांच्या लक्षात आणूनही कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही, असा आरोप वैशालीच्या आईने केला आहे.
त्यांच्या मुलीच्या छातीत सलग २ तास दुखत असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिले तरीही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती गंभीर बनल्यावर तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. काही वेळातच तिचा मृत्यू झाला, असा आरोप परशराम सिंग राजपूत यांनी केला आहे. बीम्स रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता . एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.
दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या डॉ सोनाली सरनोबत यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त जिल्हा रुग्णालय प्रशासन आणि कर्नाटक काँग्रेस सरकारवर याचे खापर फोडले आहे. काँग्रेस सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध करतो. यावर आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी
योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय या महिलांचा मृत्यू ही खरी समस्या आहे आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नुकतेच आम्ही हिवाळी अधिवेशनात याच मुद्द्यावर विरोध केला पण निष्फळ ठरला अशी प्रतिक्रिया राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉ सोनाली सरनोबत यांनी दिली आहे.