बेळगाव लाईव्ह : दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या निधनावर आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी केलेली महत्वाची कार्ये आणि योगदानावर मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला.
मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले, एस.एम. कृष्णा हे दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी दीर्घकाळ राजकारण केले आणि अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांच्या कारकिर्दीचा प्रभाव राज्याच्या सर्वच क्षेत्रांवर पडला. एस.एम. कृष्णा यांची राजकीय कारकीर्द खूपच समृद्ध होती. 1962 मध्ये त्यांनी स्वातंत्र्यपूर्व विधानसभेच्या निवडणुकीत भाग घेतला. त्यानंतर ते विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा, लोकसभा आदी ठिकाणी कार्य केले.
राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल अशा महत्त्वपूर्ण पदांवर ते कार्यरत होते. जेव्हा एस.एम. कृष्णा महाराष्ट्र राज्यपाल होते, तेव्हा मी काँग्रेस पक्षात सामील झालो. त्यांना मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय दिला आणि त्यांनी त्या निर्णयाचे स्वागत केले.
एस.एम. कृष्णा हे एक आदर्श संसदीय नेते होते. त्यांनी कधीही द्वेषपूर्ण राजकारण केले नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिंगापूरसारख्या प्रगतीकडे नेण्याचा दृष्टिकोन होता. बेंगळुरूला ‘सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया’ बनवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले.
एस.एम. कृष्णा यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये कार्य करताना त्यांचा दृषटिकोन आणि कार्यप्रणाली उत्कृष्ट होती. नंतर भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.
ते एक सक्षम प्रशासक आणि आदर्श नेते होते, असे सांगत मुख्यमंत्री सिद्दरामय्यांनी एस.एम. कृष्णा यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे क्षण आणि त्यांच्या योगदानाचे गहन विश्लेषण केले.