Thursday, December 5, 2024

/

परीक्षा अर्जासाठी वापरले जाणारे दोषपूर्ण सॉफ्टवेअर रद्द करा : अभाविपचे आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने परीक्षा अर्जांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोषपूर्ण सॉफ्टवेअरविरोधात आंदोलन छेडले. अभाविपने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी त्वरित सोडविण्याची मागणी केली.

यु. यु. सी. एम. एस. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील विविध विद्यापीठांत परीक्षा प्रवेशासाठी अर्ज स्वीकारले जातात. परंतु, या सॉफ्टवेअरमध्ये गंभीर तांत्रिक दोष असून, त्यामुळं विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. सदर सॉफ्टवेअर तातडीने रद्द करण्यात यावे, अन्यथा सुवर्णसौधला घेराव घालण्याचा इशारा अभाविप तर्फे देण्यात आला.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शुल्क भरल्यानंतरही अर्ज नोंदवले जात नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दुहेरी नुकसान होत आहे.

यामुळे आर्थिक व शैक्षणिक नुकसानीचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच राणी चन्नम्मा विद्यापीठाने हे सॉफ्टवेअर पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय लागू करू नये. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या समस्या लवकर सोडवण्यात आल्या नाही, तर आगामी काळात आणखी तीव्र पद्धतीने आंदोलन सुरु केले जाईल , असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने देण्यात आला. या आंदोलनात शेकडो अभाविप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.