बेळगाव लाईव्ह : हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे.
भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी बेळगावसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या भागात ‘भाग्योदय’ दिनदर्शिका हि विश्वसनीय दिनदर्शिका म्हणून प्रसिद्ध आहे. तिथी, वार, नक्षत्र, योग यासह इत्यंभूत पंचांगाची माहिती देणारी दिनदर्शिका गेल्या ७९ वर्षांपासून प्रत्येक घराच्या भिंतीवर दिसून येते.
भारतातील पहिली मराठी दिनदर्शिका असणारी भाग्योदय दिनदर्शिका याची स्थापना रामचंद्र हनुमंत जाधव यांनी केली. या दिनदर्शिकेचा संपादिका ज्योती गजानन जाधव या असून सर्वाधिक माहितीचे लोकप्रिय पंचांग म्हणून भाग्योदय नावारूपाला आले आहे.
बेळगाव, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा यासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका यासारख्या परदेशातही या पंचांगाला मोठी मागणी आहे. गेल्या ७९ वर्षांपासून या सेवेत असणाऱ्या भाग्योदय पंचांग आणि दिनदर्शिकेची या व्यवसायामधील ही तिसरी पिढी आहे.
सर्व ग्रहांचे योग, नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती, विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती,
धार्मिक कृत्यांविषयीचे निर्णय, गृहप्रवेश, ग्रहांच्या अंतर्दशा,चंद्र व सूर्य यांचे उदयास्त, नक्षत्रभ्रमण आणि त्यांची ग्रहणे, जत्रा, दाने व जप, धर्मशास्त्रीय शंका समाधान,नांगरणी-पेरणीपासून ते धान्य भरण्यापर्यंत, बारसे, पायाभरणी, मासिक भविष्य, भूमिपूजन, मकरसंक्रांत, मुंज/उपनयनसंस्कार, मुहूर्त, यात्रा, राजकीय व सामाजिक भविष्ये, राशींचे घातचक्र,
लग्नसाधन, वास्तुशांती, व्रत वैकल्ये, विवाह, सण, संतांची जयंती व पुण्यतिथी, हवामान व पर्जन्यविचार आदींचा लेखाजोखा भिंतीवर टांगलेल्या भाग्योदय च्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला मिळतो. यामुळेच आज प्रत्येक मराठी घराच्या भिंतीवर भाग्योदय दिनदर्शिका पाहायला मिळते.
यंदाच्या नव्या वर्षासाठी भाग्योदय दिनदर्शिका बाजारपेठेत उपलब्ध झाली असून यासोबत छोटे पंचांग देखील मोफत देण्यात येत आहे.