बेळगाव लाईव्ह : पंचमसाली आरक्षण मुद्द्यावरून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी टीका केली असून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दुटप्पी धोरण सोडावे, अशी टीका त्यांनी केली.
पंचमसाली समाजाची मुलगी म्हणून आरक्षणाच्या आंदोलनात आपण लढायला आलो होतो. मात्र सभागृहात आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेलो, अशी प्रतिक्रिया मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली होती.. या प्रतिक्रियेवरून आम. यत्नाळांनी मंत्री हेब्बाळकरांना टोला लगावला.
शुक्रवारी बेळगावात पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसमध्ये राजू कागे आणि बाबासाहेब पाटील यांच्याशिवाय काहींनी समाजाविरुद्ध षडयंत्र रचले असून, ते मंत्री व्हायला सांगत आहेत, असे सभागृहात सांगून मंत्रिपदाची मागणी करत आहेत.
आमच्या सरकारमध्ये आम्ही पंचमसाली समाजाला 2 डी आरक्षण दिले आहे. आम्ही आमच्या समाजालाच नव्हे तर ४० जातींना ७ टक्के आरक्षण दिले आहे. हे 104 विविध समाजाला लागू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. आम्ही न्यायालयात निवेदन दिले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यापासून टू डी आरक्षणासाठी न्यायालयात लढा द्यावा लागत असल्याचे ते म्हणाले.