बेळगाव लाईव्ह : प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांनी हलगा मच्छे बायपास रस्त्याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी अलारवाड क्रॉस ते मच्छे दरम्यान सर्वेक्षण करून रस्त्याच्या समस्यांचा आढावा घेतला.
शेतकरी नेत्यांसह त्यांनी बायपास रस्त्याच्या परिसराची तपासणी केली आणि पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणाची पडताळणी केली.
प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांनी अलारवाड क्रॉस ते मच्छे दरम्यान सर्वेक्षण करत रस्त्याच्या समस्यांची पाहणी केली. शेतकरी नेते राजू मर्वे आणि इतर स्थानिक नेत्यांनी रस्त्याच्या समस्यांबद्दल प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिली.
शेतकऱ्यांना होणारे नुकसान आणि त्यांना मिळणारी भरपाई याबाबतही चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही पाहणी करण्यात आली होती, ज्यामुळे रस्त्याच्या समस्यांचे योग्य निराकरण होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.