बेळगाव लाईव्ह:येळळूर येथे जय महाराष्ट्र फलक आठवल्यानंतर शांततेत आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवरच अमानुष लाठी हल्ला करून शेकडो ग्रामस्थांना जायबंदी केले.
त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल केले याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत नऊ ग्रामस्थ गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर सोमवारी वॉरंट बजावण्यात आले.
गेल्या नऊ वर्षापासून हा खटला सुरू आहे. आज सुनावणीत जवाब नोंदवण्यात येणार होते. पण आज मारुती महादेव अष्टेकर, जयवंत गंगाराम टक्केकर, सदानंद यल्लाप्पा पोटे, प्रशांत शंकर टक्केकर, बाळू शंकर धामनेकर,
रजत परशुराम संभाजीचे, कपिल मल्लाप्पा भोवी, बसवराज शिवाप्पा कलमठ आणि अतुल नारायण मुचंडी हे गैरहजर राहिले त्यामुळे त्यांना वॉरंट बजावण्यात आला. पुढील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.