Monday, November 25, 2024

/

भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रेलरला धडक; 1 ठार, 2 जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:भरधाव कार गाडीने उसाच्या चिपाडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 जण ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील अलारवाड ब्रिज जवळ घडली.

अपघातात ठार झालेल्या कार मधील दुर्दैवी व्यक्तीचे नांव गिरीश के. कुलकर्णी (वय 24, रा. कुमार पार्क हुबळी) असे आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. राष्ट्रीय महामार्गावर काल रविवारी रात्री एक ट्रॅक्टर उसाची चिपाड भरलेले दोन ट्रेलर घेऊन निघाला होता.

त्यावेळी मागून येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेल्या कारने (क्र. केए 63 एम 5618) ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रेलर उलटून पडला त्याचप्रमाणे कारच्या दर्शनीय भागाचा चक्काचूर झाला.

अपघात घडताच आसपासच्या नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने थांबून घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह पोलीस देखील त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारमध्ये अडकून पडलेल्या कार चालकासह अन्य प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.

तसेच रुग्णवाहिकेतून सर्व जखमींची रवानगी सिव्हिल हॉस्पिटलकडे करण्यात आली. मात्र त्यांच्यापैकी गिरीश कुलकर्णी हा जागीच ठार झाल्याचे आढळून आले. अपघात स्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तथापि जेसीबी व क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून मार्ग वाहतुकीस खुला करण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.Accident

दरम्यान अलीकडे सुवर्ण विधानसौध ते अलारवाड ब्रिज दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला कारण महामार्गाच्या दुतर्फा पथदिपांचा अभाव आहे त्यामुळे रस्त्याच्या या ठराविक भागातील अपघातांना आळा घालायचा असेल तर त्याला एकच पर्याय म्हणजे महामार्गाच्या दोन्ही बाजूला पथदिपांची सोय करावी.

विधानसौध ते अलारवाड ब्रिज दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधार असतो त्यामुळेच असे वारंवार अपघात होत असल्याचे या भागातील गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.