बेळगाव लाईव्ह : विविध ८ ठिकाणच्या मंदिरांमध्ये चोरी करून, मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणाऱ्या चोरट्याना गजाआड करण्यात हारुगेरी पोलिसांना यश आले आहे .
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 11,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद तसेच डीसीपी श्रुती यांच्या मार्गदर्शखाली पोलिसांचे एक पथक तयार करून या प्रकरणाचा तपास करण्यात आला असून चोरी प्रकरणी चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींनी अलगवाडी, बस्तवाड, मुगळखोड, हिडकल, हारुगेरी, निडगुंदी आणि सत्ती या गावात एकूण 8 मंदिरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे .
आरोपींकडून , चोरी करण्यात आलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि 120,000 रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 11,52,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हारुगेरी पोलीस स्थानकाचे सीपीआय डी. बी. रविचंद्र यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय मलप्पा पुजारी, बी. एल . होसट्टी, रमेश पुरदिमनी, ए. ए. शिंदे, पी. एम. सप्तसागर, एच. आर. आंबी, विनोद ठकन्नावर यांनी तपास केला. बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.