बेळगाव लाईव्ह :विद्यार्थ्यांनी जीवनात एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त ताण न घेता आपल्या बालपणीचा जास्तीत जास्त आनंद लुटावा असे आवाहन
पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी केले आहे.
KRONOS V 10 या आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन स्तरावरील कला, सांस्कृतिक आणि साहित्यिक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सेंट पॉल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजने सेंट पॉल्स हायस्कूल कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या या दोन दिवसीय स्पर्धा महोत्सवात सुमारे 15 शाळा आणि काही कनिष्ठ महाविद्यालयांनी भाग घेतला आहेत.
“आमच्या काळातील शिक्षक आजच्या पेक्षा खूप वेगळे होते. मला प्रत्येकाचा आदर करायला शिकवले गेले. तुम्ही उद्याचे सितारे आहात. मी एक सामान्य विद्यार्थी होतो आणि सामान्य विद्यार्थी जीवन जगत होतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक दिवशी साध्य करण्यासाठी आम्हाला नेहमीच दबावाखाली रहावे लागते. पण कोणतीही घाई करण्याची गरज नाही, कारण हे विसरू नका की आम्हाला बालपण कधीच परत मिळणार नाही, त्यामुळे तुमचे बालपनाचा भरपुर आनंदाने घ्या असे त्यांनी आवाहन केले.
सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य सायमन फर्नांडिस यांनी ‘अनवेलिंग अर्थ्स इव्होल्युशन’ या कार्यक्रमाच्या थीमवर प्रकाश टाकताना सांगितले की, मानवाची उत्क्रांती वानरापासून झाली आहे, असे म्हटले जाते. आता मानवाची अर्थात नराची उत्क्रांती नारायणा मध्ये’ किंवा अधिक चांगले मानव बनण्यासाठी व्हावी ,” फादर सायमन म्हणाले.
सुरुवातीला सेंट पॉल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत सादर केले. सेंट जोसेफ कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापक सिस्टर नतालिया डिमेलो, सेंट पॉल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य फादर स्टीव्हन आल्मेडा, व्हाईस प्रिन्सिपल अलेंद्रो दा कोस्टा, पत्रकार लुईस रॉड्रिग्स अतिथी . म्हणुन उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य देखील सादर केले. कार्यक्रमाला विविध शाळांचे शिक्षक व पालक उपस्थित होते.
या स्पर्धा उत्सवात नृत्य, गायन, सिनेमॅटोग्राफी, टेक फेस्ट, डिबेट, फॅशन शो, वक्तृत्व, कला, स्पेल बी इत्यादी स्पर्धा होणार आहेत. शनिवारी संध्याकाळी सेंट पॉल हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सांगता कार्यक्रमात पोलीस आयुक्त इयाडा मार्टिन मारबानियांग प्रमुख पाहुणे असतील आणि विजेत्यांना बक्षिसेही देतील असे फादर सायमन यांनी सांगितले.