बेळगाव लाईव्ह :पक्षी प्रेमी नागरिकांच्या सहकार्याने फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आज शुक्रवारी सकाळी एका जखमी धनेश (हॉर्नबिल) पक्षाला जीवदान देण्याचे स्तुत्य कार्य केले.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, संतोष दरेकर यांना शुक्रवारी सकाळी व्हॅक्सीन डेपो मैदानाजवळील नेहरू रोड, टिळकवाडी येथील अमृता धोंड यांचा फोन आला.
त्यांनी आपल्या घराच्या आवारात हॉर्नबिल या इंग्रजी नावाचा धनेश पक्षी जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती दरेकर यांना दिली. तेंव्हा त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन त्या असहाय्य पक्षाला काळजीपूर्वक ताब्यात घेतले.
त्यानंतर कर्नाटक वनविभागाचे कार्यालय गाठून संतोष दरेकर यांनी तेथील बीट वनाधिकारी मल्लिकार्जुन जटन्नावर यांच्याकडे त्या इंडियन ग्रे हॉर्नबिल अर्थात भारतीय करड्या रंगाच्या धनेश पक्षाला उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी सुपूर्द केले.
पक्ष्याच्या छातीवर आणि मानेवर जखमा झाल्या असून वन पथकाने त्याला अधिक उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले आहे.