बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगावमधील सदाशिवनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र नजीक एक सोन्याचे लॉकेट हरवले होते, अनेक प्रयत्नानंतरही लॉकेट न सापडल्याने मूळ मालकांनी याविषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली.
दरम्यान हरवलेले सोन्याचे लॉकेट माशीकसाब धन्नूर नावाच्या रिक्षाचालकाला मिळाले, मूळ मालकाचा शोध घेत, सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे सदर लॉकेट मूळ मालकांना परत सोपविण्यात आले.
सदाशिवनगर येथील जय भीम ऑटो रिक्षा स्टँडवरील रिक्षाचालकाला सोन्याचे लॉकेट सापडले. बँकेत कामानिमित्त जात असता खाली पडलेले लॉकेट निदर्शनात येताच याबाबत रिक्षाचालकाने आपल्या सहकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली.
यानंतर मूळ मालकांचा शोध घेत सदर लॉकेट प्रामाणिकपणे त्यांच्या हाती सुपूर्द केले. रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत
असून मूळ मालकांकडून रिक्षाचालक माशीकसाब धन्नूर यांच्यासह त्यांचे सहकारी नारायण गोजेकर, उदय कुरणे, मैनुद्दीन छज्जू, आणि लतीफ गाडिवाले यांचा सत्कार करत, योग्य पारितोषिक देऊन कृतज्ञता व्यक्त केली.




