बेळगाव लाईव्ह :जगभरात चर्चेचा विषय झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाला असून बेळगावसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे या निवडणुकीअंती अमेरिकेने ज्या 6 भारतीयांना स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून संधी दिली आहे.
त्यामध्ये मूळचे मिरापूर गल्ली येथील श्री ठाणेदार यांचा समावेश आहे. या पद्धतीने श्री ठाणेदार दुसऱ्यांदा अमेरिकेचे सिनेट्स सदस्य म्हणून निवडले गेले आहेत.
जगभरात चर्चेचा विषय झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेच्या सिनेटमध्ये सहा भारतीयांनाही स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाचं म्हणजे यात मराठमोळ्या मूळच्या मिरापूर गल्ली, शहापूर बेळगाव येथील श्री ठाणेदार यांचाही समावेश आहे. ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. याआधी अमेरिकेत पाच अमेरिकन- भारतीय वंशाचे उमेदवार सिनेट सदस्य म्हणून निवडून आले होते. यावेळी ही संख्या सहावर गेली असून यामध्ये बेळगावचे श्री ठाणेदार यांची अमेरिकेच्या सिनेट्स सदस्य पदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
श्री ठाणेदार हे मिशिगनच्या 13 व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. या डिस्ट्रिक्ट मधून त्यांनी 2023 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती.
दुसरीकडे भारतीय वंशाच्या राजा कृष्णमूर्ती यांनी सलग पाचव्यांदा इलिनॉयचा सातवा काँग्रेसनल जिल्हा जिंकला आहे. त्याचप्रमाणे कॅलिफोर्नियाच्या सतराव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व रो खन्ना आणि काँग्रेस वुमन प्रमिला जयपाल या वॉशिंग्टन राज्यातील सातव्या काँग्रेसनल जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.