- बेळगाव लाईव्ह : तरुण मंडळ नंदगड आयोजित 65 दीपावली क्रीडा महोत्सव आज होणार उद्घाटन 65 वर्षांपूर्वी तरुण मंडळ नंदगड चे संस्थापक अध्यक्ष कै एम के पाटील एसएम गडकरी यांना चंदगडकर यांनी दुर्गम असलेल्या खानापूर तालुक्यातील युवकांना आपल्या अंगभूत कलागुणाचे दर्शन घडावे यासाठी तरुण मंडळ नंदगड च्या वतीने कबड्डी स्पर्धाचे आयोजन केले. त्या दिवशीपासून आजपर्यंत निरंतर
दीपावलीमध्ये नंदगड येथील संत मेलगे विद्यालयाच्या पटांगणात ह्या कबड्डी स्पर्धा भरवल्या जातात.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तालुक्यातील प्रतिभावंतानी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा जाहीर सत्कार सुद्धा या ठिकाणी केला जातो. आज पाडव्याच्या मूर्तीवर दरवर्षीप्रमाणे या 65 व्या दीपावली क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आजी-माजी आमदार व राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
गोवा महाराष्ट्र कर्नाटक येथील कबड्डी संघ या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असतात सतत 65 वर्ष कबड्डी स्पर्धा भरवणार मंडळ म्हणून तरुण मंडळ परिचित आहे या दीपावली क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी तत्कालीन गोवा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या आजी-माजी मंत्री उपस्थित राहात आलेले आहेत वजन गटात 60 किलो एक गाव एक संग खुल्या कबड्डी सामने व खुल्या गटात एक गाव एक संघ असे दोन विभागात कबड्डी स्पर्धा खेळवल्या जातात.
गेल्या पंधरा वर्षापासून या मंडळाची जबाबदारी राजू पाटील नागेंद्र पाटील राजेंद्र पाटील किरण पाटील दिलीप पाटील के व्ही पाटील पांडू पाटील धनंजय पाटील अशा बऱ्याच आजी-माजी खेळाडूंनी घेतलेली आहे आज दुपारी ठीक एक वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
या स्पर्धेतील कबड्डी सामने हे दिवसा खेळवले जातात याची नोंद भाग घेऊ इच्छिणाऱ्या कबड्डी संघाने घ्यावी असे मंडळाकडून सुचविण्यात आले आहे.