Saturday, December 28, 2024

/

बैलहोंगलमध्ये ‘मर्डर’, 13 जणांनी केला हल्ला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :पूर्व वैमनस्यातून 13 जणांनी बिअर बाटल्या आणि लाठ्या-काठ्याने हल्ला करून एका युवकाचा भीषण खून केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील गावामध्ये घडली आहे.

खून झालेल्या युवकाचे नांव रवी तमन्नावर (वय 23 वर्षे) असे आहे. पूर्ववैमनस्यातून ही खुनाची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

बैलहोंगल गावातील शाळेच्या मैदानावर 13 जणांनी रवि याच्यावर रिकाम्या बिअरच्या बाटल्या आणि लाठ्याकाठ्याने हल्ला केला. या प्राणघात हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रवी याला स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

मात्र उपचाराचा फायदा न होता अतिरक्तस्त्रामुळे त्याचा मृत्यू झाला.

बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या या घटनेप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.