बेळगाव लाईव्ह :युवा शक्ती एकवटली तर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्राबल्य वाढण्यास अधिक वेळ लागणार नाही. त्यामुळे युवा आघाडीच्या नव्या कार्यकारिणीची निवड झाली आहे.
राजू किणेकर यांच्या रूपाने धडपडणारा मराठी विषयी तळमळ असणारा कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला आहे. तालुक्यात युवकांची संघटना बांधून पुन्हा समितीला बळकटी आणा असे आवाहन ज्येष्ठ युवा कार्यकर्ते बाबाजी देसूरकर यांनी काढले.
मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या तालुका म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्षपदी राजू किणयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सचिवपदी शंकर कोणेरी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी अनिल पाटील यांनी, समितीच्या प्रत्येक लढ्यात युवकांची कामगिरी महत्वाची असते. समितीच्या आदेशाची अंमलबजावणी करणे आणि मराठी लोकांची ताकद वाढवण्यासाठी युवा आघाडीचे काम महत्वाचे असणार आहे, असे सांगितले.
यावेळी अध्यक्षपदी राजू किणयेकर, विभागवार उपाध्यक्षपदी चेतन पाटील (पश्चिम), प्रशांत पाटील (उत्तर), दीपक आंबोळकर (दक्षिण) आणि किरण पाटील (पूर्व) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी शंकर कोणेरी, सहसचिवपदी सोमनाथ पाटील, खजिनदारपदी अंकुश पाटील, उपखजिनदारपदी महादेव गुरव, जनसंपर्क प्रमुखपदी जोतिबा मुरकुटे यांनी निवड करण्यात आली. याशिवाय 31 जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली.
यावेळी मल्लाप्पा पाटील, किसन लाळगे, शिवानंद कोळी, मयूर बसरीकट्टी, यल्लाप्पा सावंत, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले. तालुका समितीच्या बैठकीत या कार्यकारिणी आणखी युवकांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली.