Thursday, January 2, 2025

/

खाडी जलतरणात बेळगावचा स्मरण, बेंगलोरची डिंपल अजिंक्य!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावचा दीर्घ पल्ल्याचा मातब्बर युवा जलतरणपटू स्मरण सुजित मंगलोरकर आणि बेंगलोरच्या डिम्पल गौडा यांनी महाराष्ट्रातील मालपे ते विजयदुर्ग दरम्यानच्या ऐतिहासिक वाघोटन खाडीमध्ये आयोजित 15 कि.मी. अंतराच्या राज्यस्तरीय जलतरण शर्यतीचे अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने विजयदुर्ग येथील श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने विजयदुर्ग प्रेणोत्सव समितीच्या सहकार्याने आणि जिम स्विमिंग अकॅडमीच्या नियोजनाखाली मालपे ते विजयदुर्ग खाडीमध्ये नुकतेच 15 व 30 कि.मी. अशा दोन विभागात जलतरण शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

या शर्यतींमध्ये 5 ते 59 वर्षे वयोगटातील बहुसंख्य जलतरणपटूंनी सहभाग दर्शवला होता. शर्यतींचे उद्घाटन प्रसिद्ध दिग्दर्शक केदार गायकवाड यांच्या हस्ते झाले होते. दोन विभागापैकी 30 कि.मी. अंतराच्या शर्यतीचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. आता 15 कि.मी. जलतरण शर्यतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून तो खालील प्रमाणे आहे.Swimming

खुलागट (पुरुष) -1) स्मरण सुजित मंगलोरकर (बेळगाव), 2) मानव राजेश मोरे (ठाणे), 3) आयुष प्रवीण तावडे, 4) शिवराज नागेश पाटील (कोल्हापूर), 5) सार्थक संदीप (कोल्हापुरे). कोल्हापूर. महिला गट -1) डिंपल गौडा (बेंगलोर), 2) आयुष्य कैलाश आखाडे (ठाणे),

3) अनन्या पवन पत्की (कोल्हापूर), 4) स्मृती सचिन जांभळे (ठाणे), 5) किमया गायकवाड (ठाणे). सदर शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ संजना आडवे, प्रदीप साटणकर, रविकांत राणे

आणि बाबू डोंगरे हस्ते पार पडला. शर्यतीसाठी पंच म्हणून शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, अर्जुन मगदूम, रणजीत शिंदे व सचिन जांभळे यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.