Friday, December 27, 2024

/

गोंधळी गल्लीच्या युवकाचा वेळागर समुद्रात बुडून मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह :वेंगुर्ले -शिरोडा वेळागर येथील समुद्रात रविवारी आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील विनायक रमेश शिंदे (44) या पर्यटकाला पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते.

हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीचवर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून हे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र यातील विनायक शिंदे हा पाण्याच्या प्रवाहामुळे पुढे गेला.Shinde

किनाऱ्यापासून काही अंतरावरच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या बाबत शिरोडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

पप्पू  उर्फ विनायक हा श्रीराम सेना हिंदूस्थानचा धडाडीचा कार्यकर्ता तसेच समाजसेवक होता.श्रीराम सेना हिंदूस्थानच्या माध्यमातून कोरोना महामारीत काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.