बेळगाव लाईव्ह : शेतात काम करत असताना मधुमाशांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे इस्पितळात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.मोनाप्पा शंकर भातकांडे राहणार होसुर असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत समजलेला अधिक माहितीनुसार होसूर बसवण गल्ली येथील प्रगतशील शेतकरी मोनाप्पा हे मंगळवारी सकाळी होसुर बंडी मार्ग या शिवारात शेताला गेले असताना मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले होते या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मारुती हलगेकर व मोनापा भातखंडे दोघेही जखमी झाले होते.
ज्यावेळी मधमाशांनी हल्ला केला त्यावेळी मारुती तेथून दूरवर पळून गेले यावेळी अंदाजे 20 माशानी हल्ला करत त्यांना जखमी केले पण मोनापा भातखंडे या हल्ल्यात जबर जखमी होते जवळपास तीन साडेतीनशे माशांनी त्यांचा चावा घेतला होता.
या घटनेत ते अत्यवस्थ झाले होते उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा कोणताही उपयोग न झाल्याने बुधवारी त्यांचे निधन झाले.
बुधवारी सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला त्यांचं वय 74 वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी भावजय दोन पुतणे तीन पुतण्या नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी आठ वाजता होसुर स्मशान खासबाग या ठिकाणी होणार आहे.