Wednesday, January 1, 2025

/

22 डिसें. रोजी मराठा बँकेची निवडणूक; वेळापत्रक जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाजाची मानबिंदू म्हणून ओळखली जाणारी मराठा को-ऑप बँक लि. बेळगाव अर्थात मराठा बँकेची निवडणूक जाहीर झाली असून येत्या रविवार दि. 22 डिसेंबर 2024 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार असून त्यानंतर शुक्रवार दि. 6 डिसेंबरपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी उलाढाल असणारी को-ऑप बँक म्हणून मराठा बँककडे पाहिले जाते. सध्याच्या विद्यमान संचालक मंडळातील कांही सदस्यांच्या बाबतीत नाराजी असल्याने यावेळच्या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे यंदाच्या या मराठा बँकेच्या निवडणुकीत रंगत येणार असल्याची त्यांनी चिन्हे दिसू लागली आहेत.

विद्यमान सत्ताधारी पॅनलमध्ये दोन ज्येष्ठ संचालकांवर सत्ताधारी पॅनल निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली असली तरी अद्याप एकमत झाले नसल्याने कोण कोण रिंगणात येणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मराठा बँकेच्या संचालक मंडळाची रचना 13 जणांची असून यापैकी निवडून येणारे प्रतिनिधी (अनुक्रमे मत क्षेत्र -निवडून देण्याच्या संचालकांची संख्या, यानुसार) पुढीलप्रमाणे असतील. सामान्य वर्ग -09, महिला राखीव -02, मागास ‘अ’ वर्ग -01, मागास ‘ब’ वर्ग -01, मागास परिशिष्ट जाती -01, मागास परिशिष्ट जमाती -01, एकूण 15. मराठा बँक निवडणूक अधिकारी भरतेश शेबण्णावर यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीचे वेळापत्रक (अनुक्रमे तारीख, कार्यक्रमाचा तपशील, वेळ व स्थळ यानुसार) पुढील प्रमाणे असणार आहे. दि. 06-12-2024 : पात्र मतदार व थकबाकीदार सभासदांची यादी प्रकाशित करणे, बँकेच्या नोटीस बोर्डावर संध्याकाळी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून. दि. 07-12-2024 : निवडणुकीस इच्छुक उमेदवारांनी नामपत्र भरण्यास प्रारंभ करण्याचा दिवस, बँकेच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी यांच्याकडे. दि. 14-12-2024Maratha bank logo

: निवडणुकीस इच्छुक उमेदवारांनी नामपत्र भरण्याचा अखेरचा दिवस, बँकेच्या कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी यांच्याकडे. दि. 15-12-2024 : उमेदवारांच्या नामपत्रांची छाननी, बँकेच्या कार्यालयात दुपारी 12 वाजता निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून. दि. 15-12-2024 : छाननी नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रकाशित करणे, बँकेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून. दि.16-12-2024 : उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख, बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी यांच्याकडे. दि. 1612-2024

: निवडणुकीस उभे राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित करणे, बँकेच्या कार्यालयात दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून. दि. 16-22-2024 : निवडणूक अधिकाऱ्यांकडून पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप करणे, बँकेच्या कार्यालयात दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणुका अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून. दि.18-12-2024 : चिन्हासहित पात्र उमेदवारांची यादी जाहीर, बँकेच्या कार्यालयात दुपारी 3 नंतर निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकारी यांच्याकडून. दि. 22-12-2024 : निवडणूकचे मतदान, मराठा बँक बसवान गल्ली बेळगाव येथे सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत. दि. 22-12-2024 : मतमोजणी व निकाल, बँकेच्या कार्यालयात.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.