बेळगाव लाईव्ह:ड्रोन डेस्टिनेशन लिमिटेड कंपनीला कर्नाटकातील बेळगाव येथील नव्या केंद्रात डीजीसीए-प्रमाणित ड्रोन प्रशिक्षण सुरू करण्यासाठी डीजीसीएची अधिकृत मान्यता मिळाली आहे. बेळगुंदी गावातील इंडियन आय सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने बेळगाव ड्रोन डेस्टिनेशन कर्नाटक सरकारच्या समाज कल्याण विभागाद्वारे नामनिर्देशित 500 एससी/एसटी उमेदवारांना ड्रोन प्रशिक्षण देईल. तसेच नामनिर्देशित उमेदवारांसाठी उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
यापूर्वी सदर कंपनीने भारतातील विविध जीआयएस प्रकल्पांसाठी भू-स्थानिक ड्रोन डेटा संपादन आणि प्रक्रिया सेवा प्रदान करण्यासाठी जेके ग्रुपचे सदस्य असलेल्या सप्तर्षी कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेडशी सामंजस्य करार केला आहे. ड्रोन डेस्टिनेशन कंपनीचा अल्प परिचय
: ड्रोन डेस्टिनेशन भारताच्या ड्रोन उद्योगात आघाडीवर आहे. ही कंपनी प्रमाणित ड्रोन पायलट प्रशिक्षणापासून ते अत्याधुनिक ड्रोन-एज-ए-सर्व्हिस (डास) सोल्यूशन्सपर्यंत सर्वसमावेशक सेवा प्रदान करते. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेले ड्रोन डेस्टिनेशन कृषी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक ड्रोन मोहिमा आणि प्रशिक्षण देते. विशेष म्हणजे एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवरील पहिली सूचीबद्ध ड्रोन कंपनी म्हणून ड्रोन डेस्टिनेशनला औद्योगिक क्षेत्रात एक प्रतिष्ठित स्थान आहे. या कंपनीचे प्रशिक्षण कार्यक्रम मानक स्थिर निश्चित करण्याबरोबरच इच्छुक वैमानिकांना सुरक्षितता आणि कार्यक्षमतेच्या कौशल्याने सुसज्ज करतात.
इंडियन आय सिक्युरिटी प्रा. लि.चा अल्प परिचय : इंडियन आय सिक्युरिटी प्रा. लि. (आयएसएल) ही आयएसओ 9001:2008 प्रमाणित कंपनी आहे. सध्याच्या राष्ट्रीय आणि जागतिक सुरक्षा वातावरणात भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, कंपन्या आणि व्यक्तींना सहाय्य करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
जी स्मार्ट तंत्रज्ञानावर आधारित उपायांचा समावेश करून भविष्यातील स्मार्ट शहरे अधिक स्मार्ट बनवण्यास मदत करणार आहे. आघाडीच्या जागतिक कंपन्यांसोबतचे आमचे सहकार्य 3 दशकांहून अधिक सखोल असून जे सुरक्षेच्या क्षेत्रातील विस्तृत अनुभवांना एकत्र आणते. ई-गव्हर्नन्स, ऍक्सेस कंट्रोल, पर्सनल सेफ्टी, मॉनिटरिंग इत्यादीसाठी आमचे सोल्युशन्स फेस रेकग्निशन, व्हॉइस रेकग्निशन आणि भिन्न मोबाइल प्लॅटफॉर्म आधारित ऍप्लिकेशन्स यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित आणि मान्यताप्राप्त सुरक्षा दलांच्या विशेष प्रशिक्षणासह प्रगत तंत्रज्ञानाची जोड देऊन इंडियन आय सिक्युरिटी प्रा. लि. कंपनी शहरांमधील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वसमावेशक उपाय देखील प्रदान करते. याखेरीज आयएसएल कंपनी पोलिस दल, उद्योग आणि व्यक्तींना योग्य प्रशिक्षण देखील देते.