बेळगाव लाईव्ह:बेळगाव रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 कडे जाणारा फुट ओव्हर ब्रिज (एफओबी) दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून दुरुस्तीचे काम त्वरेने पूर्ण करून हा एफओबी खुला करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील फूट ओव्हर ब्रिजच्या जिन्याची दुरुस्ती कांही दिवसापासून केली जात आहे. त्यामुळे सदर जिना वापरासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 कडे जाण्याचा मार्ग असलेला एफओबीचा जिना बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. फूट ओव्हर ब्रिजचा मार्ग बंद असल्यामुळे त्यांना अन्य मार्गाने अन्य प्लॅटफॉर्म गाठताना त्रास सहन करावा लागत आहे.
काही प्रवासी प्लॅटफॉर्म वरून खाली रुळावर उतरून रूळ ओलांडून पलीकडचा प्लॅटफॉर्म गाठत आहेत. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे धावपळ करताना प्रवाशांची दमछाक होत आहे.
विशेष करून महिला वर्गाला मोठा मनस्ताप आणि त्रास सहन करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील फूट ओव्हर ब्रिजचा जिना दुरुस्त करण्याचे काम त्वरेने पूर्ण करून हा जिना पूर्ववत वापरासाठी खुला करण्यात द्वारे प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.