Wednesday, January 1, 2025

/

एसडीसीची कार्यालयात आत्महत्या… हादरले बेळगाव तहसील कार्यालय!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एका द्वितीय दर्जा कारकूनाने (एसडीसी) कार्यालयामधील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून त्यामुळे तहसीलदार कार्यालय हादरून गेले आहे.

आत्महत्या करणाऱ्या एसडीसी अर्थात द्वितीय दर्जा कारकुनाचे नांव रुद्रेश यडवन्नावर असे आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज मंगळवारी सकाळी 10 -10:15 वाजता कार्यालय उघडले असता एसडीसी रुद्रेश याने कार्यालयातील चक्क तहसीलदारांच्या केबिनमध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.

जवळपास 32 वर्षीय वयाचे मयत रुद्रेश यडवन्नावर हे द्वितीय दर्जा कारकून असण्याबरोबरच तहसीलदारांचे केस वर्कर होते. तहसीलदारांच्या केबिनमध्ये त्यांनी केलेल्या आत्महत्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली असून तर्कवितर्क केले जात आहेत. आत्महत्येच्या या घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याबरोबरच चौकशी व तपास कार्य हाती घेतले आहे.

Suicide मिळालेल्या माहितीनुसार एसडीसी रुद्रेश यडवन्नावर हे विवाहित असून त्यांच्या पत्नी देखील महसूल खात्यात तलाठी म्हणून काम करतात. रुद्रेश यांची अलीकडेच त्यांच्या मनाविरुद्ध बदली झाली होती. त्यामुळे त्या नाराजीतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा कयास आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत असून विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी रुद्रेश यांनी तलाठी समुदायाच्या ग्रुपवर संदेश टाकला होता.

एकंदर त्यांच्या आत्महत्येमुळे तहसीलदार कार्यालय हादरले असून त्यांच्या आत्महत्येचे निश्चित कारण पोलीस तपासाअंती स्पष्ट होणार आहे. खडेबाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास कार्य सुरू आहे.

त्यांच्या पत्नी ह महसूल खात्यात कार्यरत असून त्या देखील तलाठी आहेत घटनेची माहिती मिळताच त्या देखील तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्या त्यावेळी त्यांनी एकच हंबरडा फोडला आणि त्यांना दुःख अनावर झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.