बेळगाव लाईव्ह : माघारीच्या शेवटची दिवस असल्याने चंदगड मतदारसंघातून ८ जणांनी सोमवारी माघार घेतली असून १७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अखेर शिवाजी पाटील यांनी महायुतीत तर महाविकास आघाडीत विनायक पाटील यांनी बंडखोरी केल्याने महायुती व महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
महाविकास आघाडीचे नेते गोपाळराव पाटील व महायुतीचे संग्राम कुपेकर यांनी ही माघार घेतली आहे.
तर अपक्ष सुश्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग खोराटे, केदारी यल्लाप्पा पाटील, नारायण रामू वाईगडे, आण्णासाहेब विनायक पाटील, प्रकाश राजाराम कागले यांनी ही निवडणुकीतून माघार घेतली.
यामध्ये विद्यमान आमदार राजेश पाटील यांना महायुतीकडून तर जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मानसिंग खोराटे तर महाविकास आघाडीकडून डॉ. नंदिनी बाभूळकर तर अपक्ष म्हणून शिवाजी पाटील, विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम केली आहे.
तसेच बहुजन समाज पार्टीकडून श्रीकांत अर्जुन कांबळे, वंचित बहुजनकडून अर्जुन मारुती दुंडगेकर, संभाजी ब्रिगेड पार्टीकडून परशराम पांडुरंग कुट्रे, अपक्ष म्हणून अशोक शंकर आरर्दाळकर, अक्षय एकनाथ डवरी, संतोष आनंदा चौगुले, जावेद गुलाब अंकली, तुलसीदास लक्ष्मण जोशी, समीर म्हम्मद इसाक, प्रकाश रामचंद्र रेडेकर, मोहन प्रकाश पाटील, रमेश सटूप्पा कुट्रे हे ही उमेदवार रिंगणात आहेत.