Friday, December 27, 2024

/

काळ्या दिनाच्या सायकल फेरीवर पोलिसांची वक्रदृष्टी गुन्हे दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : 1 नोव्हेंबर 1956 पासून बेळगाव केंद्र सरकार विरोधात भाषिक प्रांत रचनेच्या विरोधात झालेल्या अन्याय विरोधात रॅली काढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांवर बेळगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

1956 पासून 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव सह सीमा भागात काळादिन पाळला जातो केंद्र सरकार विरोधात निदर्शने करत निषेध फेरी काढली जाते. यावर्षीही काळ्या दिना मराठी भाषिकांनी भव्य रॅली काढत केंद्र सरकारने केलेल्या अन्यायाचा निषेध नोंदवला होता. या काळ्या दिनाच्या सायकलीत सहभागी झालेल्या 45 समितीने ते आणि कार्यकर्त्यांवर मार्केट पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 1500 अज्ञात कार्यकर्त्यांसह तीन मराठी भाषिक वकिलांवर देखील पोलिसांनी गुन्हे घातले आहेत.

कोणता ठेवला ठपका

आय पी सी सेक्शन 189(2),192,292,285,190 नुसार मार्केट पोलिसांनी जबरदस्तीने गर्दी गोळा करणे,जिल्हा प्रशासनाकडून परवानगी न घेता रॅली काढणे,अन्य भाषिकांचा अवमान करणे, रहदारीला अडचण निर्माण करून जनतेला त्रास करणे,
जाणून बुजून मराठीतून राज्य विरोधी घोषणा देणे,
कन्नड भाषिकांच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणे असा ठपका ठेवला आहे.

पोलिसांनी काळ्या दिनाच्या निषेध फेरीत सहभागी 3 मराठी भाषिक वकिलांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल केलेल्या समिती नेते आणि कार्यकर्त्यांची सूची अशी आहे. त्यात तालुका समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर,शहर समिती कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील,

वकील अमर येळ्ळूरकर,माजी नगरसेवक गजानन पाटील(गमपा)माजी नगरसेवक नेताजी जाधव
अध्यक्ष अंकुश केसरकर,विकास कलघटगी
मदन बामणे,सचिन केळवेकर,प्रशांत भातकांडे
जयेश भातकांडे,महेश नाईक,महादेव पाटील,शुभम शेळके, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर
माजी जिल्हापंचायत सदस्या सरस्वती पाटील
माजी महापौर सरिता पाटील,

किरण हुद्दार,दत्ता उघाडे,श्रीकांत कदमचंद्रकांत कोंडुसकर संतोष कृष्णाचे,गुंडू कदम,माजी नगरसेवक सुनिल बाळेकुंद्री,गणेश दड्डीकर,हनुमंत मजुकर प्रकाश शिरोळकर,आर. एम. चौगुले,वकील सुधीर चव्हाण
मल्लाप्पा पाटील,नागेश पाटील,सुरज येळ्ळूरकर
श्रीकांत चव्हाण,सदा चव्हाण,किरण मोदगेकर
शिवाजी मंडोळकर,वकील महेश बिर्जे
सुहास हुद्दार,उमेश कुऱ्याळकर,जोतिबा पालेकर
बाबुराव केरवाडकर,किरण गावडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.