बेळगाव लाईव्ह :नैऋत्य रेल्वेने अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी आणि सबरीमलाला जाणाऱ्या अय्यप्पा स्वामी भक्तांच्या सोयीसाठी हुबळी-कोल्लम आणि बेळगाव-कोल्लम स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक दिशेने एकूण 6 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
रेल्वे गाडी क्र. 07313 /07314 एसएसएस हुबळी-कोल्लम-एसएसएस हुबळी स्पेशल एक्सप्रेस (6 फेऱ्या)
रेल्वे क्र. 07313 एसएसएस हुबळी येथून येत्या 5 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान दर गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) दुपारी 4:30 वाजता कोल्लम येथे पोहोचेल. रेल्वे क्र. 07314 कोल्लम येथून दर शुक्रवारी 6 डिसेंबर 2024 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत संध्याकाळी 6:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (शनिवारी) संध्याकाळी 7:35 वाजता एसएसएस हुबळी येथे पोहोचेल.
प्रवास मार्गात दोन्ही दिशांना ही रेल्वे हावेरी, रानीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, कदूर, अर्सिकेरे, तुमकुरू, एसएमव्हीटी बेंगलोर, कृष्णराजपुरम, बंगारापेट, सालेम, इरोड, तिरुपूर, कोईमतूर, पलक्कड, त्रीसूर, अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायाम, चांगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा आणि कायनकुलम रेल्वे स्थानकांवर थांबा घेईल.
रेल्वे गाडी क्र. 07317 /07318 : बेळगाव-कोल्लम-बेळगाव विशेष एक्सप्रेस (6 फेऱ्या)
रेल्वे क्र. 07317 बेळगावहून 9 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान दर सोमवारी दुपारी 2:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) दुपारी 4:30 वाजता कोल्लम येथे पोहोचेल. रेल्वे क्र. 07318 ही कोल्लम येथून 10 डिसेंबर 2024 ते 14 जानेवारी 2025 दरम्यान दर मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (बुधवारी) रात्री 10:00 वाजता बेळगाव येथे पोहोचेल. प्रवास मार्गात दोन्ही दिशांना ही रेल्वे खानापूर, लोंढा, धारवाड, एसएसएस हुबळी, हावेरी, रानीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, कदूर, अर्सिकेरे, तुमकुरू, एसएमव्हीटी बेंगळुरू, कृष्णराजपुरम, बंगारापेट, सेलम, इरोड, तिरुपूर, कोईमतूर, पलक्कड, त्रिसूर अलुवा, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चांगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा आणि कायनकुलम रेल्वे स्थानकांवर थांबा घेईल.
प्रत्येक रेल्वेला 18 कोचेस (डबे) असतील ज्यामध्ये एसी टू-टायर, 4 एसी थ्री-टायर, 11 स्लीपर क्लास, 1 एसएलआरडी, 1 लगेज, ब्रेक आणि जनरेटर व्हॅन असेल. प्रवाशांनी चौकशीसाठी अधिकृत वेबसाइट (www.enquiry.indianrail.gov.in) वर भेट देऊन, NTES ॲप वापरून किंवा 139 डायल करून रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळा तपासू शकतात.