Thursday, November 7, 2024

/

शहरातील नो -पार्किंगच्या आदेशात ‘अशी ही’ सुधारणा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रशासनाकडून बेळगाव शहरातील रस्ते सुरक्षा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसंदर्भात वाहने पार्क करण्यास मनाई करणाऱ्या आदेशात सुधारणा करून त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे.

नो पार्किंग : 1) डॉ. बी. आर. आंबेडकर रोडवर राणी चन्नम्मा सर्कल ते डॉ. बी. आर. आंबेडकर गार्डनपर्यंत. 2) केएलई हॉस्पिटल रोडवर कृष्णदेवराय सर्कल ते शिवबसवनगर क्रॉसपर्यंत. 3) जुन्या पी.बी. रोडवर कृष्णदेवराय सर्कल ते संगोळ्ळी रायण्णा सर्कलपर्यंत.

4) संगोळ्ळी रायण्णा रोडवर चन्नम्मा सर्कल ते संगोळ्ळी रायान्ना सर्कलपर्यंत, त्याचप्रमाणे किल्ला तलाव अशोक सर्कल ते कनकदास सर्कलपर्यंत. 5) किल्ला तलाव अशोक सर्कल ते जुन्या गांधीनगर क्रॉसपर्यंत. 6) सर्किट हाऊस ते मुजावर खूटपर्यंतचा रस्ता.

7) जुन्या पीबी रोडवरील मध्यवर्ती बस स्थानक ते व्हीआरएल ऑफिस पर्यंतचा रस्ता. 8) धर्मनाथ भवन ते पोलीस भवनपर्यंतचा न्याय मार्ग रस्ता. 9) रामदेव हॉटेल क्रॉस ते धर्मनाथ भवनपर्यंतचा रस्ता. दक्षिण विभाग रहदारी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रानुसार 10) चन्नम्मा सर्कल श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूने पवन हॉटेलपर्यंतचा कॉलेज रोड.

दरम्यान, प्रशासनाकडून बेळगाव शहरातील रस्ते सुरक्षा आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसंदर्भात वरील प्रमाणे सुधारणात्मक बदल करण्यात आला असता तरी त्याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या पद्धतीने जर पार्किंग झोन करण्यात आले तर लोकांनी आपली वाहने पार्क करायची कुठे? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

कृपया बेळगाव महापालिका अधिकाऱ्यांच्या पायाचे छायाचित्र पाठवा सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घालूया.. अशी विनंती एकाने केली आहे. रस्त्यांची दुरुस्ती आणि रहदारी व्यवस्थापन या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून अनावश्यक पार्किंग नियम लागू करण्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करून या पद्धतीने नो पार्किंग झोन असतील तर पार्किंग के लिए बचा क्या फिर? गाड्या डोक्यावर घेऊन फिरायच्या का? असा संतप्त सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

या पद्धतीने नो पार्किंग असेल तर कृपया सायकल ट्रॅक काढून टाका. महापालिकेने ठराविक भागात सार्वजनिक पार्किंग जागा निर्माण केली पाहिजे, असे काहींनी सुचवले आहे. प्रत्येकाने आपल्या गाड्या घरात ठेवून पायी चालत जावे. जेणेकरून पेट्रोलची विक्री घटेल आणि सरकारला जाग येऊन ते योग्य विचार करेल, असा सल्ला एकाने दिला आहे. पप्पू गव्हर्मेंटच्या तुघलकी कल्पना… असा शेरा आणखी एका नेटकार्‍याने मारला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.