belgaum

रजेवर आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाची आत्महत्या

0
11
Army
 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय सैन्य दलात सेवा वाजविणाऱ्या आणि रजेनिमित्त आपल्या गावी आलेल्या जवानाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावचे रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार (२८) हे रजेवर आपल्या गावी आले होते. रजेवर आलेल्या या जवानाने कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कित्तूर तालुक्यातील देगांव येथील रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.. २० दिवसांपूर्वी रजेनिमित्त ते आपल्या गावी आले होते. मात्र, काल पुन्हा सेवेवर रुजू होण्यासाठी सैन्यात परतणार असल्याचे सांगून घरातून बाहेर पडून कित्तूर तालुक्यातील परसनट्टी तलावात उडी घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समजते आहे.Army

 belgaum

वैवाहिक आयुष्यातील तणावामुळे सदर जवानाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रविण गंगोळ व प्रविण कोटी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

यावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा शोध घेतला असून, काल सायंकाळपासून तलावात शोधमोहीम राबवली जात आहे. यापकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.