बेळगाव लाईव्ह : बेळगाव विमानतळाचे उपसंचालक प्रतापराव देसाई यांनी 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती घेतली आहे. या निमित्ताने त्यांचा विमानतळ प्रशासनाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
उपसंचालक प्रतापराव देसाई आणि सौ. छाया प्रतापराव देसाई या दाम्पत्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी देसाई दाम्पत्याची रथावरून मिरवणूक काढण्यात आली.
बेळगाव विमानतळाचे उपसंचालक अभियंते प्रतापराव देसाई यांची 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा नुकतीच संपन्न झाली असून, त्यांनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये आपल्या कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विमानतळ प्रशासनाने सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
गुरुप्रसाद नगर येथील रहिवासी प्रतापराव देसाई यांच्यासाठी खास मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रथावरून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विमानतळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गेल्या 6 वर्षापासून देसाई हे बेळगाव विमान तळावर सहाय्यक विमान तळ संचालक म्हणून कार्यरत्त होते त्यांनी गेल्या 36 वर्षापासून एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये देशातील विविध ठिकाणी सेवा बजावली आहे.
या सोहळ्यात एपीडी त्यागराजन, माजी प्राचार्य घोरपडे, रिजनल हेडक्वार्टरचे जीएम गणेशमूर्ती आणि हॉटेल मेरीयेटचे जीएम कपूर यांचीही उपस्थिती होती.
दिल्ली येथे कार्यरत असलेले बेळगाव विमानतळाचे तात्कालीन संचालक राजेश कुमार मौर्य यांनीही देसाई यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देत त्यांनी बेळगाव विमानतळासाठी दिलेल्या सेवेच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.