बेळगाव लाईव्ह :येळळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळूळूर’ या फलकाच्या खटल्यांची सुनावणी न्यायालयात सुरू असून चार खटल्यांपैकी दोन खटल्यासंदर्भात आज सोमवारी बेळगाव न्यायालयासमोर चार साक्षी नोंदविण्यात आल्या.
जिल्हा प्रशासनाने गेल्या जुलै 2014 मध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्तात येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येऊर फलक हटवल्यानंतर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठी जनतेला पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली.
त्यानंतर आंदोलन करणाऱ्या 222 जणांवर गुन्हे दाखल करून खटले भरण्यात आले. त्यापैकी खटला क्र. 125/15 आणि 122/15 संदर्भात आज सोमवारी न्यायालयासमोर साक्षी नोंदविण्यात आल्या. 125/15 खटला क्र. 42 आरोपी आहेत. सदर खटल्यासंदर्भात आज पीडीओ रणजीत सिंग उदय सिंग राजपूत, पीडीओ गोपाळ होसकोटी आणि शिवानंद रुद्रस्वामी हिरेमठ या तिघांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
त्याचप्रमाणे खटला क्र. 122/15 मध्ये पीडीओ गोपाळ दुंडाप्पा होसकोटी यांची साक्ष नोंदविण्यात आली. या पद्धतीने आज एकूण चार खटल्यांपैकी दोन खटल्यांसंदर्भात साक्ष नोंदविण्यात आली.
न्यायालयामध्ये आज उपस्थित असलेल्या संबंधित खटल्यांचे साक्षीदारांसह गेली 9 वर्षे लढा देणाऱ्या येळळूरवासियांची रमाकांतदादा कोंडुसकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या वकील वर्गाशी चर्चा केली. येळ्ळूर महाराष्ट्र फलक प्रकरणी 222 लोकांपैकी 185 लोकांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत.
येत्या एक ते दीड महिन्यात सदर खटल्याचा निकाल लागून सर्व आरोपी निर्दोष होण्याची शक्यता कायदे पंडित आणि व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्र राज्य येळूळूर’ फलकाच्या खटल्यातील आरोपींच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. श्याम पाटील, ॲड. महेश मोरे, ॲड. शंकर बाळनाईक, ॲड. विशाल चौगुले आदी वकील काम पाहत आहेत. सुनावणी दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांनी वकिलांची भेट घेऊन चर्चा केली.