Monday, October 21, 2024

/

विदेशी पर्यटकांना ‘राजहंसगडाची’ भुरळ!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दक्षिण मतदार संघातील येळ्ळूर येथे असणाऱ्या राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, गडकिल्ल्याची भ्रमंती करण्यासाठी आज साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील पर्यटक दाखल झाले होते.

बेळगाव तालुक्यातील पर्यटकांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या राजहंसगड किल्ल्यावर आज ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन झाले.

साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील जवळपास 25 ते 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्यावरती भेट देत गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेत गडाची भ्रमंती केली. यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिर आणि शिवरायांचे दर्शन घेताना चप्पल – बूट बाजूला ठेवत शिवरायांप्रती असलेला आदर व्यक्त करत लक्ष वेधून घेतले.Australia

राजहंसगडावरील तैनात असलेल्या टुरिझम डिपार्टमेंटच्या पोलिसांकडून पर्यटकांना सहकार्य करण्यात आले. यावेळी गडावरील पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, चोर दरवाजा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचीमूर्ती, किल्ल्याचे सुशोभीकरण, व स्वच्छता पाहून विदेशी पर्यटक भारावून गेले. जवळपास तीन तास विदेशी पर्यटकांनी गडभ्रमंती केली.

राजहंसगडाचे सुशिभिकरण आणि मूर्ती प्रतिष्ठापना पार पडल्यानंतर गडावर भेट देणाऱ्या स्थानिक नागरिकांसह विविध ठिकाणचे पर्यटक दाखल होत आहे. रविवार, सरकारी सुट्टी यासह महत्वाच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून पर्यटकांची उपस्थिती पाहता या ठिकाणी पार्किंग, स्वच्छतागृह यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.