Sunday, November 17, 2024

/

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वयस्क धावपटू देवरमणी यांना 3 सुवर्ण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावचे ज्येष्ठ क्रीडापटू आणि भारतीय संरक्षण सेवेतील निवृत्त कर्मचारी 72 वर्षीय एस. एल. देवरमणी यांनी सिंगापूर व मलेशिया येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या “एसबीकेएफ 10 वे आंतरराष्ट्रीय खेळ -2024” मधील दीर्घ पल्ल्याच्या धावणे व चालण्याच्या शर्यतींमध्ये सुवर्ण पदक पटकावण्याद्वारे बेळगावसह आपल्या भारत देशाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

सिंगापूर व मलेशिया येथे गेल्या 22 ते 30 सप्टेंबर या कालावधीत “एसबीकेएफ 10 वे आंतरराष्ट्रीय खेळ -2024” चे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देवरमणी यांनी देशाचा नावलौकीक वाढवला असून अलीकडेच त्यांनी नेपाळ, श्रीलंका, स्वीडन आणि दुबई या देशांना भेटी दिल्या आहेत.

सिंगापूर व मलेशिया येथील चॅम्पियनशिपमध्ये देवरमणी यांनी 10 कि.मी. धावण्याची शर्यत , 5 कि.मी. धावण्याची शर्यत, 5 कि.मी. चालण्याची शर्यत (स्टेडियमच्या आत) यामध्ये भाग घेतला. या शर्यतींमध्ये जगातील विविध देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. उपरोक्त तीनही शर्यतीन मध्ये एस. एल. देवरमणी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे.

आपल्या शानदार कारकिर्दीत वयस्कर धावपटू देवरमणी यांनी कॉलेजच्या दिवसांपासून आजपर्यंत 400 पदके कमावली आहेत. राणी चन्नम्मा नगरमध्ये छोटे किराणा स्टोअर चालवणारे सेवानिवृत्त एस. एल. देवरमणी यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेला पाठिंबा आणि प्रेरणेबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच बेंगलोरला पोहोचण्यासाठी रेल्वे तिकिटाची व्यवस्था करण्यास मदत केल्याबद्दल रेल्वे पोलीस (जीआरपी) व्यंकटेश यांचेही आभार मानले आहेत.Devarmani

सिंगापूर मलेशिया येथील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक निधीची व्यवस्था करण्यास सहकार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीमचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, विजय भद्र, सौरभ सावंत, नितीन लोकूर, ओम अनावेकर, सोहम अनावेकर, शैलेश भातकांडे, सुनील धोंगडी, उदय किंजवडेकर, किरण निप्पाणीकर, मंदार कोल्हापुरे चंद्रकांत चव्हाण केएलएस पब्लिक स्कूल बेळगावचे व्यवस्थापन मंडळ, केएलएस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शालिनी संक्रोनी, मोफिदा येल्लूर, प्रमोद ओऊळकर, गीता कलभावी आणि सर्व विद्यार्थी आणि एक्सपर्ट व्हॉल्व्स अँड इक्विपमेंट्स प्रा. लि.चे संस्थापक विनायक लोकूर यांचे देखील देवरमणी सरांनी आभार मानले आहेत.

आता उद्या बुधवारी सकाळी 9 वाजता एस. एल. देवरमणी बेळगावी रेल्वे स्थानकावर पोहोचतील. तेव्हा सर्व क्रीडाप्रेमींनी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.