Wednesday, December 25, 2024

/

ढगफुटी सदृश्य पावसामुळे भात पिकं आडवी; शेतकरी चिंतेत

 belgaum

बेळगाव लाईव्ह:काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार ढगफुटी सदृश्य परतीच्या पावसामुळे बेळगाव शहरालगत असलेल्या सर्व शिवारांमध्ये कापणीला आलेली भात पिके आडवी झाल्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

मागील आठवड्याभरापासून ऑक्टोबरची हिट जाणवत असताना गेल्या मंगळवार सायंकाळ पासून बेळगाव शहरासह परिसरात परतीच्या पावसाने दणका देण्यास सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरणासह दिवसभर तुरळक हजेरी किंवा एखाद दुसऱ्या जोरदार सरीच्या स्वरूपात पडणारा परतीचा पाऊस रात्रीच्या वेळी रौद्ररूप धारण करत आहे.

काल बुधवारी रात्रीपासून आज गुरुवारी पहाटेपर्यंत असाच ढगफुटी सदृश्य जोराचा पाऊस झाल्यामुळे अनगोळ, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर, हलगा वगैरे बेळगावच्या आसपास असणाऱ्या शिवारातील भात पिके आडवी झाली आहेत.Paddy

अवघ्या 8 -10 दिवसांवर कापणीसाठी आलेली ही भात पिके या पद्धतीने मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

परतीचा पाऊस याच पद्धतीने कोसळत राहिल्यास हाता तोंडाशी आलेले भात पीक नष्ट होऊन कोट्यावधीचे नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एकंदर परतीच्या पावसामुळे भात पिकं धोक्यात येण्याबरोबरच सोयाबीन पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.