Saturday, December 21, 2024

/

जुगारी अड्ड्यावरील छाप्यात 4.81 लाख जप्त; 12 जण गजाआड

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुत्नाळ (ता. बेळगाव) गावाजवळील एका शेडवर गेल्या मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री छापा टाकून सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 12 जुगार यांना अटक करण्याबरोबरच त्यांच्या जवळील 4 लाख 81 हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.

पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे शहाबाद खादीरसाब तिगडी, रियाज हुसेनसाब पटेल (दोघेही रा. हिरेबागेवाडी), स्वप्नेश तवनाप्पा बेन्नाळी (रा. गोकाक) इराप्पा बसाप्पा मदनहळ्ळी (रा. बैलहोंगल), प्रकाश रायाप्पा नायकर (रा. कारीमनी), यल्लाप्पा बाळाप्पा अरेन्नावर (रा. गोकाक), इराप्पा यल्लाप्पा नायकर (रा. सोमनट्टी), लिंगनगौडा शिवणगौडा पाटील (रा. देवलापूर), मलिकजान रसूलसाब उस्ताद (रा. हिरेबागेवाडी), चेतन मारुती चंदगडकर (रा. सांबरा), यल्लाप्पा हणमंत जट्टणनावर (रा. देवलापूर) आणि मल्लिकार्जुन चन्नमल्लाप्पा होटी (रा. बैलहोंगल) अशी आहेत. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या मंगळवारी 15 ऑक्टोबर रोजी रात्री मुत्नाळपासून हिरेबागेवाडी टोलनाक्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याला लागून असलेल्या एका शेडवर छापा टाकून बारा जुगार यांना अटक केली. तसेच त्यांच्या जवळून 4 लाख 81 हजार हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले.

पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग तसेच दोन्ही पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार जी. आर. शिरसंगी, एस. बी. पाटील, एम. एम. वडेर, ए. एन. रामनगौडनट्टी, एम. एस. पाटील आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने उपरोक्त कारवाई केली. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.