Monday, December 30, 2024

/

कणकुंबी येथे बनावट दारूसह 84.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव -गोवा सीमेवरील खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथील अबकारी तपासणी नाक्याच्या ठिकाणी आज मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून रिकामी प्लास्टिक कॅन आणि बकेट घेऊन येणाऱ्या एका कंटेनरमधील 48 लाख 96 हजार रुपये किंमतीच्या बनावट दारूसह एकूण तब्बल 84 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती बेळगाव (दक्षिण) जिल्ह्याच्या अबकारी उपायुक्तांनी दिली.

अबकारी उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, कणकुंबी येथील अबकारी तपासणी नाक्याच्या ठिकाणी आज मंगळवारी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून रिकामी प्लास्टिक कॅन आणि बकेट घेऊन येणाऱ्या चॉकलेटी रंगाचा आयशर प्रो -2118 हा कंटेनर अडवून अबकारी अधिकाऱ्यांकडून जीएसटी कागदपत्रांची तपासणी व शहानिशा केली जात होती.

त्यावेळी संशयावरून गोव्याहून प्लास्टिक कॅन व बकेट घेऊन येणाऱ्या त्या कंटेनरची झडती घेण्यात आली असता. सदर कंटेनर बनावट दारूची बेकायदा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या या दारूची किंमत 48 लाख 96 हजार रुपये इतकी होते.

जप्त करण्यात आलेल्या दारूच्या ब्रँडचे नांव ‘एव्हर ग्रीन रिझर्व्ह व्हिस्की’ असे आहे. सदर दारूसह 35 लाख रुपये किमतीचा कंटेनर व 30000 किमतीचे प्लास्टिक कॅन व बकेट असा एकूण 84 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला दारूचा साठा गोव्याहून नेण्यात येत असला तरी तो कोण? कोठे घेऊन जात होता? हे तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.Arrack

महाराष्ट्र किंवा कर्नाटक लगतच्या राज्यांमध्ये निवडणुका असतील तर आम्ही आमच्या खात्यातील अधिकारी व व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगतो. त्यामुळेच आज इतका मोठा बेकायदेशीर दारू साठा सापडला आहे. खबरी वगैरेकडून कोणतीही माहिती उपलब्ध नसताना हा दारू साठा पकडण्यात आला हे विशेष होय. अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण आणि त्यांचा अनुभव यामुळे हे शक्य झाले आहे.

‘एव्हर ग्रीन रिझर्व्ह व्हिस्की’ ही दारू अधिकृतरित्या फक्त ठाणे महाराष्ट्र येथील जस्ट ट्री डिस्टलरीजमध्ये उत्पादित केली जाते. मात्र आम्ही जप्त केलेली ही दारू महाराष्ट्रात तयार झाली आहे की गोव्यामध्ये बनावटरित्या तयार करण्यात आली आहे ते तपासात स्पष्ट होणार आहे. जप्तीच्या कारवाईप्रसंगी कंटेनर चालक घटनास्थळावरून फरारी झाला असून त्याचा शोध जारी आहे अशी माहिती देऊन कंटेनर मालकाचे नांव त्याला अटक केल्यानंतर जाहीर केले जाईल असे जिल्हा अबकारी उपायुक्तांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.