Saturday, December 21, 2024

/

देसूर गावात उद्योजक टक्केकर यांच्याकडून टँकरने पाणी पुरवठा

 belgaum

बेळगाव लाईव्ह:अद्याप पावसाळाही संपलेला नसताना पाणी टंचाईची समस्येला उद्भवलेल्या देसूर (ता. जि. बेळगाव) गावच्या मदतीला धावून जाताना उद्योजक गोविंद टक्केकर यांनी सदर गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे.

पावसाळ्याचे दिवस अद्याप समाप्त झालेले नसताना बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

यंदा बेळगाव तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून सध्या परतीचा पाऊस देखील जोमात आहे. त्यामुळे नदी-नाले जलाशयांमध्ये पाण्याचा उत्तम साठा झालेला असताना देखील देसूरवासीयाना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागत आहे.Govind

ही बाब कानावर येताच उद्योजक गोविंद टक्केकर देसूरवासीयांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी स्वखर्चातून गावातील नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे गावकऱ्यात समाधान व्यक्त होत असून ते उद्योजक टक्केकर यांना दुवा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.