Thursday, December 26, 2024

/

तपास यंत्रणांच्या डोकेदुखीत भर!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्याभरात बेळगाव शहर व उपनगरात आठहून अधिक गर्भवती महिलांच्या बँक खात्यातून रक्कम लाटण्यात आली असून फसवणुकीच्या या नव्या फंड्यामुळे तपास यंत्रणांचीही डोकेदुखी वाढली आहे.

पोषण अभियानांतर्गत सरकारी मदत मिळेल, या आशेने बसलेल्या गर्भवती महिलांची लुबाडणूक केली जात आहे. गेल्या आठवड्याभरात तब्बल ८२.८२ हजार रुपयांची गर्भवती महिलांची लुबाडणूक करण्यात आली असून या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन बेळगाव शहर पोलीस सीईएन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या पोषण अभियान अंतर्गत गर्भवती महिलांच्या बँक खात्यात 7 हजार 500 रुपये जमा केले जातात. त्यांची यादी वेगवेगळ्या गावातील, गल्ल्यांमधील अंगणवाडी कार्यकर्त्यांकडे असते. या यादीतील गर्भवती महिलांशी संपर्क साधून त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. सुमारे आठहून अधिक महिला तक्रार देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शहर सीईएन पोलीस स्थानकात पोहोचल्या होत्या.Cen

पोषण अभियान योजनेच्या लाभार्थी महिलांना कॉल येतो. तुमच्या बँक खात्यात 7 हजार 500 रुपये जमा होणार आहेत. त्याआधी तुमच्या व्हॉट्स अपवर एक लिंक पाठवली जाईल, त्यावर क्लिक करा आणि ओटीपी कळवा, लगेच तुमच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगितले जात आहे.Mhadai

त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून ओटीपी पाठवताच बँक खात्यातील रक्कम गायब केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिजिटल अरेस्टच्या प्रकारानंतर सायबर गुन्हेगारांनी आता गर्भवती महिलांना आपले टार्गेट बनविले आहे. पोषण अभियान अंतर्गत नावे नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांच्या बँक खात्यातील रक्कम गायब करण्याचा सपाटाच गुन्हेगारांनी सुरू केल्याने एकच खळबळ माजली आहे.Navratri

यासंबंधी शहर सीईएन पोलीस विभाग आणि शहर पोलीस आयुक्तालयाने सावध राहण्याचे आवाहन केले असून कोणत्याही लिंक वर क्लिक करू नये, तसेच कोणत्याही गोष्टीसाठी ओटीपी कुणासोबतही शेअर करू नये अधिक माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी सीईएन विभागाच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.